सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस गजानन नारायण राणे यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
गजानन राणे यांचे पक्षप्रेम आणि पक्षातील धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी निष्ठेने केलेल्या कामा मुळेच त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही निवड एक वर्षाच्या कालावधी साठी असून जर त्यातून उत्कृष्ट अहवाल मिळला तर ती वाढविण्यात येईल असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे .
श्रीवर्धन तालुका संपर्क अध्यक्ष कु. प्रतीक राऊत यांनी नियुक्ती झाल्या नंतर प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
राजसाहेबांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत मी अधीक जोमाने काम करीत कामगारांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध राहणार आहे. त्याचसोबत कामगार संघटनेच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी कार्यरत राहीन.
गजानन राणे,
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना रायगड अध्यक्ष
Be First to Comment