कल्लोळ
थेंब थेंब डोळ्यातले
अश्रू गाली ओघळती
गतकालीन आठवे
पट मोकळा करिती..
झरझर मागे जाता
आठवांची होते माळ
बालपणीच्या सख्यांचे
कानी निनादती चाळ…
वेळोवेळी देती साथ
न लागे काही कयास
भावनांचा तो कल्लोळ
रिता करण्या प्रवास ..
निचरा होताच त्याचा
भार हलका मनाचा
ईश्र्वरी देणगी मोठी
मिळे आधार तयाचा..||
वर्षां मेहेंदर्गे, नवीन पनवेल







Be First to Comment