येईल कां बळ….
देवास ठाऊक जायचे कुठे
आम्ही निघालो वाट फुटेल तिथे…
पर्यायच नव्हता.. करणार काय
मार्गच सापडेना… खोलात पाय
प्रयत्न देखील केलें खूप…
देवासही लावलें अगरबत्ती धूप….
पदरी पडले निराशेचे फळ
येणार कुठून शरिरात बळ
निसर्गही चांगलाच होता
कोपला
पाऊसपाणी येता येता थांबला…
काळी आई राहिली कोरडी
बी बियाण्याची रिकामीच परडी….
डोळ्यापुढे दिसला अंधार
त्यातही सावकाराचे चार
पोराबाळांची रोज उपासमार
कुटुंब सगळं मुलीला भार…
देणेकऱ्यांचे सतत तगादे
खायचे काय त्याचेही वांदे
शेवटी मग केला निश्चय
घर सोडले नभाचा आश्रय
आम्ही निघालो वाट फुटेल तिथे
देवास ठाऊक जायचे कुठे
कुणी म्हणेल काढला पळ
पण अशक्त पंखांना येईल कां
बळ?….
मालती तळणीकर, नागपूर







Be First to Comment