उरल्या आता स्मृतीच केवळ
दु:ख उडविते मनात खळबळ
उरल्या आता स्मृतीच केवळ ||
आठवती दिन बालपणीच्या
खेळगड्यांसह आनंदाचे
सुखद आईच्या वात्सल्याचे
ममतेच्या त्या वर्षावाचे
संपून गेले कधीच ते, चल
उरल्या आता स्मृतीच केवळ ||
मग येई तारुण्य संगती
स्वप्ने सारी इथे रंगती
नवीन नाती इथे जोडिती
शृंगारे सुख-साज चढविती
तारुण्याची गेली सळसळ
उरल्या आता स्मृतीच केवळ ||
उरलो आता मीच एकटा
सर्वांमध्ये मीच करंटा
जीवन हे सारे विसकटता
कोणी नाही उरे मज अता
मनास बसते दु:खाची झळ
उरल्या आता स्मृतीच केवळ ||
कवी- मनोहर काजरेकर,
मु. पो. जांभवडे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग







Be First to Comment