सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔷🔶🔶
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपले जीवन आनंदी व कोणताही त्रास न होता जगता यावे याची पुरेपूर काळजी घेतली जाईल तसेच तरूण पिढी वाईट मार्गाकडे वळत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत तरूण पिढीने चुकीच्या मार्गावर जावू नये यासाठी खबरदारी व उपाययोजना करू असे खालापूरचे पोलीस निरिक्षक अनिल विभुते यानी सांगितले.
पञकारांशी विभुते यानी संवाद साधला.विश्वजीत काईंगङे यांच्या जागी अनिल विभुते यानी पदभार स्विकारला आहे.कोकणातून रायगङ मध्ये प्रथमच आलेले विभुते याना गुन्ह्यात अव्वल खालापूर तालुक्यात कायद्याची घङी बसविण्याचे आव्हान असणार आहे. रात्री उशिरापर्यंत ढाबे,हाँटेल येथे विनाकारण तरूण फिरतांना दिसले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चुकीला माफी नाही तसेच खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा पोलीसी इशाराच विभुते यानी दिला आहे.








Be First to Comment