
पनवेल ( संजय कदम) : नविन पनवेल सेक्टर नं. १६ येथील पोदी स्मशानभूमी पुन्हा विकसित करावी अशी मागणी पनवेल महापालिकेचे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नविन पनवेल सेक्टर १६ येथील पोदी स्मशानभूमी ही एकमेव स्मशान भूमी आहे. सदर स्मशानभूमी ही पुन्हा विकसित करणे व सर्व सोईनियुक्त करणे गरजेचे आहे. सदर स्मशानभूमीवर प्रचंड ताण असल्याने व तेथील सर्व गैरसोईमुळे मरणानंतर सुध्दा रहिवासियांना खुप त्रास सहन करावा लागतो. तसेच स्मशानालगत इलेक्ट्रीक टॉवर लाईनचे खालील म्हणजेच विचुंबे रोडलगतच्या जागेचा वापर मयत लहान मुले व काही हिंदू चालीरीतीप्रमाणे मोठया व्यक्तींना मृत्युनंतर दफन करण्याची प्रथा आहे. अशा वेळेस सध्या असलेली जागा कमी पडत असून सदर रोड व स्मशान भूमीची भिंत (टॉवर लाईन खालील जागा) हि जागा दफन भूमीसाठी ताब्यात घ्यावी अशी मागणी देखील नगरसेवक मनोज भुजबळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



Be First to Comment