महिला उपसरपंचाची खोटी सही करून केला उपसरपंचाचा राजीनामा मंजूर ! 🔷🔷🔷
कोण आहे यामागचा मास्टर माइंड ? पोलीसांचा शोध सुरू… 🔶🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । खोपोली । संतोषी म्हात्रे । 🔷🔶🔷
खोटी सही करून माजगाव उपसरपंचपदाचा राजीनामा मंजूर केल्या प्रकरणी खोटी सही केल्याच्या संदर्भात खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार जून 2020 मध्ये अज्ञात व्यक्तिने माजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मिनल जाधव ( रा.आंबिवली ता.खालापूर) यांनी ग्रुप ग्रामपचायत माजगांव उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे असे भासविण्याचे उददेशाने सहीचा गैरवापर केला.
राजीनामा नोटीस नमुना अर्जावर मिनल यांची खोटी सही करुन बनावट राजीनामा नोटीस तयार करुन ग्रामपंचायतीत राजीनामा सादर केला असे मिनल जाधव यांनी तक्रारीत नमूद केले आहे. खोटा राजीनामा तयार केल्याने मीनल यांचे उपसरपंच पद बरखास्त होऊन उपसरपंचपदाची निवडणुक जाहीर झाली होती.
फसवणूक करून राजीनामा घेतल्याचे सांगत मिनल जाधव यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खालापुर पोलीसानी भा.द.वि.सं.कलम 420, 423, 465, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात केला आहे. अधिक तपास मपोसई गायत्री जाधव करीत आहेत.








Be First to Comment