पांथस्थ
क्षणात येती अश्रू नयनी
क्षणातच हास्य उमलले
खेळ मांडला असा काहीसा
नियतिचे खेळणेच मी झाले
किती रंग हे आयुष्यातील
कित्तेक सोहळे फुलविले
पांथस्थासम मार्ग चालता
अशी..ऐकलीच का उरले ?
सांजवेळ ती येते जेव्हा
शकुंन्तही घरा परतले
क्षणैक होती भास तुझेही
वेडे..मन हे विषन्न झाले
भेटशील का सखे सावली
नेत्र जलधी सम भरले
माध्यान्हीचा दाह न आता
नभ हे कौमुदींनी सजले
सुमिता सबनीस, सेलू (परभणी)







Be First to Comment