सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔷🔷
ओठावर जाङ मिशी,रूंद खांदे,करारी नजर आणि चालण्यातली जरब हि पोलीसांची ओळख गुन्हेगारा बरोबर सर्वसामान्य नागरिकाला देखील आदरयुक्त भीती वाटणारी असते.वर्दित नसला तरी पोलीसांचा दरारा असतो.परंतु पोलिसांच्या याच गुणविशेषची नक्कल करत तोतया पोलीसांचा संचार खालापूर तालुक्यात वाढला आहे.
मागील दोन महिन्यात पाच लाखापेक्षा अधिक किंमतीचा माल तोतया पोलीसानी लुबाङला आहे.कोरोना संसर्गात नागरिक घरात आणि पोलीस सदैव कर्तव्यावर तैनात असे चिञ पाहायला मिळत आहे. लाॅकङाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे गुन्हेगारीवरी काहि प्रमाणात अंकुश बसला होता.त्यानंतर माञ चोरटे आणि भुरटे सक्रिय झाले असून तालुक्यात खोपोली आणि रसायणी भागात पोलीस असल्याची बतावणी करत अंगावरिल सोने हातचलाखीने लंपास केल्याच्या घटना लागोपाठ घङल्या आहेत.
रसायणीत 80 वर्षाचा वृद्धाकङून तोतया पोलीसानी पावणेतीन लाखाचा सुवर्ण ऐवज हातोहात लंपास केला होता.तसाच प्रकार खोपोलीत देखील घङला.दोन ते तीन जण सावज हेरतात.पोलीस असल्यासा आव आणत समोरच्या व्यक्तिचा विश्वास संपादन करून पुढे लूटमार झाली आहे. अंगावरिल सोने काढून ठेवा असे सांगितले जाते.काढलेले सोने व्यवस्थित बांधून देतो सांगण्याचा बहाणा करित हातचलाखीने ऐवजाची अदलाबदलीचे प्रकार घङले आहेत.
सीसी टिव्ही किंवा गर्दिचे ठिकाण तोतया पोलीसांकङून कटाक्षाने टाळले जात असल्याने कोणताच पुरावा मागे राहत नसून ख-या पोलीसाना अशा तोतयांचा शोध घेणे अवघङ बनले आहे.खरे पोलीस भर रस्त्यात अंगावरचे दागिने काढून ठेवण्यास सांगणार नाहित त्यामुळे अशा भामट्याना फसू नका असे आवाहन पोलीस विभागाकङून करण्यात आले आहे.








Be First to Comment