Press "Enter" to skip to content

रसायनी पोलिसांनी घेतला 20 तासात अल्पवयीन मुलीचा शोध

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔷

चांभार्ली येथील चौदा वर्षांची अल्पवयीन मुलगी अचानक तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची रसायनी पोलीसांत तक्रार करण्यात आली होती.या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी त्वरीत गुन्हा दाखल करण्यास पोना अंजिक्य म्हात्रे याना सांगितले .व तपासाची चक्रे फिरविली. त्या अन्वये अल्पवयीन मुलीस ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून कोणीतरी फुस लावून अज्ञात कारणांसाठी पळवून नेल्याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा भा.द.वि.सं.कलम ३६३ दाखल करण्यात आला .

त्वरीत पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीचा शोध घेण्याकरीता दोन पथके तयार केली.त्यांनी रातोरात रेल्वे स्टेशन , एस.टी स्टॅण्ड येथे जावून मुलीचा तपास करण्यास सुरूवात केली . तसेच पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांचे मार्गदर्शनानुसार रायगड येथील सायबर सेलचे मदतीने मुलीचे मोबाईल फोनचे लोकेशन काढण्याचे काम सुरू झाले .

दि .११ / ११ / २०२० रोजी मुलीच्या संपर्कात असणा – या सर्व मित्र , मैत्रिणींकडे चौकशी करण्यास सुरुवात झाली . मुलीचा फोन स्विच ऑफ असल्याने पोलीसांना कोणतेच धागे दोरे मिळत नव्हते .परंतू त्यामुळे खचून न जाता पोलीसांनी अविरत परीश्रम करून अल्पवयीन मुलीचे मित्र मैत्रिणींचे कडे चौकशी चालु ठेवली त्यातूनच पोलीसांना तपासाची दिशा मिळाली . संशयीत व्यक्तीचे इंस्टाग्राम अॅप्सवरील अल्पवयीन मुलीशी केलेल्या चॅटींग मधून अल्पवयीन मुलगी ही तिचे मैत्रिणींस भेटण्याकरता लखनउ येथे जाणार असल्याचे पोलीसांना समजले .

त्यानुसार लखनउकडे जाणा – या सर्व रेल्वेगाडयांचे वेळापत्रक रसायनी पोलीसांनी मिळवले . पोलीस निरीक्षक तानवडे मॅडम यांनी स.पो.नि. मुल्ला , पोसई अभिजित पाटील , पोलीस नाईक मंगेश लांगी , पोलीस नाईक अजिक्य म्हात्रे इत्यादी बरोबर चर्चा करून एक प्लॅन बनविला , अल्पवयीन मुलगी ही मुंबई मध्येच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली परंतू जो पर्यंत ती मुलगी ताब्यात येत नव्हती तो पर्यंत तीचे बाबत काय घडले असले , तीला कोणी पळवून नेले असेल का ? आणि नेले असल्यास का नेले ? असे असंख्य प्रश्न पोलीसांपुढे व मुलीचे नातेवाईकांपुढे होते .

पोलीस निरीक्षक तानवडे व पथकाने अत्यंत कौशल्याने व सायबर विभागाचे मदतीने पोलीसांनी बनविलेला प्लॅनच्या अंमलबजावणी करता पथकास मुलीचे तपासाकरता त्वरीत मुंबईस रवाना केले व घरातून आई सोबत झालेल्या बाचाबाचीमुळे घरातून निघून गेलेल्या व भरकटलेल्या मुलीस रसायनी पोलीसांनी बुर पोलीस ठाणे येथील पोलीसांची मदत घेवून शिताफिने ताब्यात घेतले .

गुन्हा घडल्या वेळेपासून अवघ्या २० तासांत रसायनी पोलीसानी अविरत परीश्रम करून मुलीचे नातेवाईकांचे सकिय सहभागाने मुलीचा शोध लावला . ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे लहान मुलाचे हातात देखील पालकांनी विश्वासाने स्मार्ट फोन दिले आहेत . पण त्या फोनचा वापर करून आपले मुल काही चुकीचे काम करत नाहीना याकडे देखील पालकानी लक्ष देण्याची गरज आहे . नाहीतर अपु – या ज्ञानामुळे मुलांकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडु शकतो नसंच नी मुले अमिषाला बळी पडु शकतात याबाबत पालकांनी जागरूक रहाणे गरजेचे आहे असे आवाहन पालीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी पालकांना केले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.