धाटाव मधील सुदर्शन कंपनीत भीषण आग : करोडो रुपयांची वित्तहानी 🔶🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔷🔷🔷
औद्योगिक क्षेत्र असलेल्या रोहा तालुक्यातील धाटाव मधील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज कंपनीत काल रात्री दरम्यान डीसिएस प्लाटमधे अचानक आज लागली.या भयावह आगीत कोट्यावधी रुपयांची वित्तहानी झाली असून सुदैवाने जीवितहानी मात्र टळली आहे.दरम्यान लागलेली आग अवघ्या दीड तासात आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजमध्ये पिगमेंटचे उत्पादन होते. जिथे आग लागली, त्या डीसीएसयलो प्लांटमध्ये यलो कलर पिगमेंट तयार होते. हे उत्पादन पेंट तयार करण्यासाठी वापरले जाते. यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक रसायन नव्हते. तसेच शिफ्ट चेंज होण्याची वेळ असल्याने या ठिकाणी कोणीही कामगार नव्हते.रात्री साडेअकराच्या सुमारास डीसीएस प्लांटला अचानक लागलेल्या आगीमुळे अनेकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
आगीच्या ज्वालांचा भडका सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याचे रात्री दरम्यान पहावयास मिळाल्याने कामगार वर्गात मात्र पळापळ झाली.आगी बाबतची माहिती मिळताच कंपनीच्या व्यवस्थापकांकडून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.अवघ्या दीड तासात आज आटोक्यात आणण्यात आली.
दरम्यान लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांची वित्तहानी झाली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या आगीच्या भयावह ज्वालामुले परिसरात सर्वत्र धूर झाल्याचे पहावयास मिळाले.आमदार अनिकेत तटकरे यांनी सुद्धा रात्री येऊन पाहणी केली.
तर ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.








Be First to Comment