परतीच्या पावसाने
परतीच्या पावसाने सगळ्यांची झाली दैना
बळीराजाच्या डोळ्यांचं
पाणीच खळेना
पीक सारं गंगामाई गेली
रात्री घेऊन
झोपेचं भय मनात
आलं दाटून
राजासारखाच तू लहरी
कुणाच्या जाऊ दारी
अपेक्षांचं ओझं आता
देऊ कुणाच्या माथ्यावरी
माहीत नाही मला
कधी बदलतील नशिबाच्या रेषा
कधी मिळेल बळीराजाला भविष्याची उज्वल दिशा
सोसून सारं करतो काळ्या आईची सेवा,
घाम गाळून ,कष्टाची भाकरी मिळावी हेच मागणे तुज पायी देवा.
नाही करणार अयोग्य विचार,शोधून
काढेन नवीन काही,कधीतरी नक्कीच होतील दिशा मोकळ्या दाही
सौ.संध्या करंदीकर, नवीन पनवेल







Be First to Comment