देवदेवस्की चा प्रकार की, पैशाचा पाऊस : सर्वत्र भीतीचे सावट 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
विज्ञानाने सर्वच क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे प्रत्येक गोष्टीत विज्ञान मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहे जग चंद्रावर गेले आहे मात्र अजूनही ग्रामीण भागातील जनता बुवाबाजी, अंधश्रद्धा, यावर विश्वास ठेवत आहे म्हणजे "जग गेले चंद्रावर व बुवाबाजीवर विश्वास ठेवणारे राहिले उंदरांवर" असे म्हटले तर वावगे ठरू नये याची प्रचिती कोलाड परिसरातील चिंचवली फाट्याजवळील महादेव वाडी जवळील कालव्याजवळ नदीच्या काठावर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई-गोवा महामार्गावर असणारे कोलाड नेहमी गजबजलेले असते याचा कोलाड पासून हाकेच्या अंतरावर असलेले चिंचवली कालव्याजवळ महादेव वाडी रस्त्याच्या बाजूला नदीच्या बाजूला चार कोंबडी डोके उडवले अवस्थेत दिसले तसेच ज्या ठिकाणी नारळ लिंबू काळा भोपळा कापून टाकलेल्या अवस्थेत दिसले तसेच बाजूला खोल खड्डा खोदून त्यामध्ये काहीतरी पुरून टाकले असल्याचे आढळले याविषयी परिसरामध्ये सर्वत्र दबक्या आवाजात कुजबुज होती त्या खड्ड्यात काय आहे ? यावर भीतीचे सावट होते त्या खड्डे बाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते नरबळी तर नाही ना ? असे तर्कवितर्क केले जात होते.

मात्र सदर घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे चिंचवली चे माजी सरपंच भास्कर पवार कार्यकर्ते यशवंत पवार पांडूरंग सानप यांनी घटनास्थळी भेट घेतली व तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. मात्र माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले कार्यतत्पर कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष जाधव हे व त्यांचे सहकारी हेडकॉन्स्टेबल सय्यद, प्रसाद पाटील, नितीन पाटील, हे घटनास्थळी येऊन तत्काळ पाहणी केली.
घटनास्थळी देवदेवस्की करताना बळी घेतलेले कोंबडी तसेच बळी देऊन काही गोणी मध्ये सुद्धा कोंबडे टाकण्यात आले होते ते बाहेर काढण्यात आले तसेच खड्डा खोदण्यात आला होता संशयास्पद वाटत होता तो आपल्या सहकाऱ्यांच्या साह्याने करण्यात आला त्यामध्ये काळया कपड्यांमध्ये दहा ते बारा बळी दिलेले कोंबडे भोपळा, लिंबू , कुवाला,अशा अनेक साहित्य त्या खड्ड्यातून बाहेर काढून खातरजमा केली त्यामध्ये कोंबड्यांचा बळी दिल्याचे सर्वांना समजले त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला याबाबत जनतेने भीतीने घाबरून जाऊ नये बुवाबाजी, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये आजारी पडल्यावर त्वरीत डॉक्टर कडे जावे.
बुवाबाजी अंधश्रध्दा यांच्या आहारी जाऊ नये आपला वेळ आपली आर्थिक नुकसान आणि करून घेऊ नये असे प्रकार निदर्शनास आल्यास कोलाड पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री सुभाष जाधव यांनी केले असून त्यांच्या तत्काळ धडकेबाज कामगिरीमुळे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे परीसरात कौतुक होत आहे.








Be First to Comment