पेण दि. ( प्रतिनिधी ) पेण- खोपोली महामार्गावरील गागोदे गावाच्या हद्दीत सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहन चालकांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अतिवेगाने बेजबाबदार तसेच बेधडकपणे वाहन चालवित एका अनोळखी महिलेला ठोकर दिल्याने त्या ठोकरीत सदर महीलेला गंभीर दुखापत झाली असून तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर महीला अंदाजे 60 वर्षांची असुन तीची उंची साडेचार फूट,चेहरा उभट, केस पांढरे, अंगात आकाशी रंगाचा ब्लाऊज, हिरव्या रंगाची साडी, हातात धातूच्या बांगड्या, गळ्यात पिवळ्या रंगाची माळ असे वर्णन आहे याबाबत अधिक माहितीसाठी पेण पोलिस ठाण्यात संपर्क साधावा या अपघाताची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








Be First to Comment