सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
मुंबई-गोवा हायवेवरील सुकेळी खिंडीत रस्त्यावर ठिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या दिसून येत असुन या भटक्या कुत्र्यांच्या रस्ता रोकोमूळे वाहन चालकांसह प्रवासी वर्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
भटक्या कुत्रांमुळे अनेक ठीक ठिकाणी अपघातांचे प्रकार घडत आहेत परंतु सर्वात म्हणजे मुंबई-गोवा हायवेवरील सुकेळी खिंडीत या भटक्या कुत्रांची भली मोठी टोळी झाली असून कधीही कुठेही सायरा वैरा पळत असल्यामुळे सततच्या रहदारीच्या मार्गारवर बहुतांश वाहन चालकांसह,प्रवासी वर्ग नागरिक हैराण होत आहेत तर या महामार्गावर दररोज जड अवजड वाहने ये जा करत असतात त्याच प्रमाणे पादचारी, सायकलस्वार, टूव्हीलर,फोर व्हीलर,अशा विविध प्रकारची वाहने ये जा करित असतात याच घाही गडबडीत असे हे भटके कुत्रे अचानक गाडी समोर येवुन मोठा आपघात होऊ शकतो.
तसेच काही कुत्रे तर अचानक पणे आरडत ओरडत अंगावर धाव घेतात आणि मग संबंधित माणसाला चावा घेतल्या शिवाय सोडणार नाही अशी गत प्रसंगी उपस्थित होत असल्याचे सर्वत्र बोलले जात असून आशा या भटक्या कुत्रांची विल्हेवाट लावणार कोण ? या महामार्गावरील भटक्या कुत्र्यांवर कोण करणार कार्यवाही? कोण करणार यांचा बंदोबस्त? कोणी तरी दख्खल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.








Be First to Comment