गरजवंतासाठी धावून गेले संदीप पाटील
नवीन पनवेल येथे एक निराधार महिलेच्या झोपडीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. हा हा म्हणता आगीच्या भक्ष्यस्थानी झोपडी येऊन अक्षरशः खाक झाली.सुदैवाने या झोपडीमध्ये राहात असलेली निराधार महिला व तिची नात या मात्र आगीतून सुखरूपपणे बाहेर पडल्या. परंतु या आगीत त्यांचे होते नव्हते तेवढे जळून खाक झाले.ही दुर्दैवी कहाणी समजताच माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत या महिलेची विचारपूस करण्याकरता धावून गेले. इतकेच नव्हे तर त्यांना निवाऱ्यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली, त्या दोघींसाठी वस्त्र विकत घेऊन दिली. तसेच पुढील काही दिवस पुरेल इतके आवश्यक जिन्नस व रेशन साहित्य त्या दोघींच्या सुपूर्द केले.गरजवंतांना साठी धावून जाणारे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांच्या समवेत जगदीश घरत, विजय म्हात्रे,तुषार भगत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.







Be First to Comment