Press "Enter" to skip to content

वंशजा मयेकर व वहिदा शेख शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त

सिटी बेल लाइव्ह । रोहे । नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के । 🔷🔶🔷


रोहे तालुक्यातील रा.जि.प.प्राथ.शाळा खारी येथील सहा.शिक्षिका वंशजा मयेकर व वहिदा शेख शिक्षकी सेवेतून सन्मानाने सेवानिवृत्त झाल्या आहेत.

गेली ३५ वर्षे शिक्षकी सेवेत कार्यरत असणा-या वंशजा मयेकर यांनी हेदवली-कर्जत, मुरूड-शिरगाव,रोहे तालुक्यात लांढर,कोकबन,कुंभोशी, खारगाव आदी ठिकाणी अध्यापनाचे कार्य करीत खारी येथे तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानाप्रमाणे ५८ वर्षी सेवानिवृत्त झाल्या.तर वहिदा शेख यांनीही तालुक्यातील पाले बु. रोठ खु., भागिरथीखार ,दाखणे ता.माणगाव येथे सेवा करून खारी येथे सेवा करून तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानाप्रमाणे ५८ वर्षी सेवानिवृत्त झाल्या.

वंशजा मयेकर व वहिदा शेख यांनी आपल्या सेवाकाळात विविध ठिकाणी अध्यापनाचे कार्य करून शैक्षणिक कार्या बरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपले मोलाचे योगदान दिले.सर्व शिकख व्रुंद व ग्रामस्थ यांच्याशी नेहमीच सलोख्याचे व सौदाहार्याचे संबंध जोपासून शालेय प्रत्येक उपक्रमात त्या नेहमीच सक्रीय असायच्या.आपल्या सुस्वभावाने विद्यार्थी वर्गातही त्या अतिशय प्रिय होत्या.त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीबद्दल त्यांना भावपुर्ण निरोप व शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी वहीदा नाईकवाडी,सुजाता मोकल ,सहाय्यक पदवीधर शिक्षक मंगेश शेरमकर,सायली दिवकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.