Press "Enter" to skip to content

कळा अंतरीच्या


कधी कळ्यांनी कधी फुलांनी
कधी फळांच्या लगडण्यानी
झुकलो अनिच्छा वा इच्छेनी
गळता बहर ताठ पुनः होवोनी

कुणी तोडताना फळे फुले
हवे तसे मजला वाकविले
तुटता डहाळी वेदनेने घेरले
पानांवर ओरखडे ही उठले

खग घरटी पिले किलबिलती
पंख फुटता दूर उडून जाती
नवे घरटे पुन्हा नवा सांगाती
सुरुच राहते ही जगरहाटी

कुऱ्हाडीचे घाव मनाची ही हाव
सोसवेना अंतरीच्या कळांचा ठाव
किती आणि कसा वाकू कुठवरी
माझीच सावली न मम ऊन सावरी

नको बहर नको घरटी आता
थकलो वाकूनी देवा धाव आता
सळसळू दे ताठ मानेने जीवनी
ओझे झटकून मोकळ्या श्र्वासांनी

भाग्यश्री गर्दे. ग्रेटर नाॅयडा.(दिल्ली)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.