Press "Enter" to skip to content

दीपावली विशेष ऑनलाइन खुली निबंध व चित्रकला स्पर्धा

निगा फाउंडेशन आवरे व सुयश क्लासेस आवरे यांचा उपक्रम 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । आवरे । प्रतिनिधी । 🔶🔷🔶

निगा फाउंडेशन आवरे व सुयश क्लासेस हे आवरे पंचक्रोशीतील उपक्रमशील संस्था होय.सालाबाद प्रमाणे आवरे गावात मिनी मॅरेथॉन आणि जलतरण स्पर्धा होत असतात,परंतु सध्या परिस्थिती पाहिली तर कोरोना या वैश्विक महामारी आणि जगावर आलेलं कोरोना संकट लक्षात घेता दीपावली विशेषतः निग़ा फाउंडेशन आवरे व सुयश क्लासेस आवरे यांच्या तर्फे दीपावली विशेष ऑनलाइन खुली निबंध व चित्रकला स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे.

स्पर्धेचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर असा राहील आणि पारितोषिक वितरण रविवार दिनांक 15 नोव्हेंबर 2020 रोजी आवरे भोळेनाथ मंदिर येथे मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर वेळी शारदा संगीत विद्यालया तर्फे दीपावली भजनसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे

विषय निबंध स्पर्धा (आजचा युवा आणि रोजगाराच्या संधी ) निबंधासाठी शब्द मर्यादा 800ते1000 शब्द लिहून स्वहस्तलिखित pdf फाईल करून संबंधित क्रमांक वर पाठविणे चित्रकला (निसर्ग संवर्धन काळाची गरज) स्वहस्तलिखित छाया चित्र pdf फाइल स्वरूपात संबंधित क्रमांक वर पाठविणे
स्पर्धेचा हेतू अथवा उद्देश एक समाजातील सर्व स्थरातील व्यक्तींना बौद्धिक क्षमतांचा वापर करून सामाजिक प्रश्न जे भेडसावत असलेले विषय यांना व्यासपीठ मिळावं म्हणून अश्या प्रकारच्या स्पर्धेचा आयोजन निगा फौंउडेशन आवरे च्या इतिहासात पाहिलांदाच अशी आगली वेगळी स्पर्धा आयोजित करत आहोत तरी निगा फौंउडेशन चे अध्यक्ष आणि सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन निगा फौंउडेशन आवरे चे अध्यक्ष निलेश गावंड सर आणि निवास गावंड सर यांनी सर्वाना केलं आहे.

ज्या स्पर्धकांना ऑनलाइन प्रवेश नोंदवायच आहे अश्या स्पर्धकांनि खालील दिलेल्या संपर्क क्रमांक यावर संपर्क करणे निवास गावंड सर 9221345869 (सुयश क्लासेस आवरे अध्यक्ष ) निलेश गावंड सर 9768041430 निगा फौंउडेशन चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर 9768041430 सारडे विकास मंच चे अध्यक्ष सौ उर्मिला म्हात्रे मॅडम 8108850650 निबंध परीक्षक श्री संतोष गावंड सर 9819924292 चित्रकला परिक्षक सर श्री आकाश घरत सर 7208549317 नेहरू युवा स्वयंसेवक माजी स्पर्धेतील तप शील साठी या मान्यवर याज कडे आपण संपर्क करावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.