Press "Enter" to skip to content

दत्ता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण,रक्तदान, आरोग्य शिबिर

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔶

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच तथा माजी उपसरपंच दत्ता शिंदे यांचा वाढदिवस मंगलवार दि.३ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने पाताळगंगा नदिकिना-यावर असणा-या श्री क्षेत्र पाताळेश्वर मंदिराच्या सभामंडपात विविध सामाजिक कार्यक्रम पार पडले.यावेली सरपंच ताईं पवार, माजी सरपंच संदिप मुंढे,माजी उपसरपंच सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत पाताळेश्र्वराचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर मंदिराच्या आवारात विविध जातींच्या वृक्षांची लागवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.व लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी माजी प्रभारी सरपंच तथा माजी उपसरपंच दत्ता खाने यांनी घेतली आहे.

यानंतर दत्ता खाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पार पडला.
श्री क्षेत्र पाताळेश्र्वर मंदिराच्या सभामंडपात श्री साईं ब्लड बँक, पनवेल यांच्या वतीने रक्तशर्करा, रक्तदाब, आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १२ ते ०२ या वेळात करण्यात आले होते.यावेली ४५ युवकांनी रक्तदान केले.डाॅ.रेखा नंद यांनी रक्तदात्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

यावेळी खालापूर पंचायत समितीच्या सभापती वृशाली पाटील, सरपंच ताई पवार, माजी सरपंच संदिप मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी उपसरपंच सुरेश पाटील,माजी उपसरपंच सुभाष सोनावले, ग्रामपंचायत सदस्या जयश्री गोपाले, संतोष मैदर्गींकर, नंदकुमार पाटील,निखिल डवले,सटू गोपाले,श्याम म्हस्कर, लक्ष्मण खाने, जिल्हा युवक काँग्रेसचे प्रशांत खाने, शिवदास जगताप, विनायक गायकवाड, संतोष पाटील,कृष्णा खाने,विश्वनाथ पाटील,ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

या मान्यवरांचा सन्मान माजी प्रभारी सरपंच व माजी उपसरपंच दत्ता खाने यांच्याहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.