Press "Enter" to skip to content

कर्जतकरांची प्रतीक्षा संपली..रूग्णांची ससेहोलपट थांबणार

उपजिल्हारुग्णालय कर्जत येथे कोविड सेंटर आयसीयु व ऑक्सिजन लिक्विड ड्युरा सिलेंडर लोकार्पण सोहळा संपन्न ! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔶🔷🔶

कोरोना काळातील गरज लक्षात घेता कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर आयसीयू व ऑक्सिजन लिक्विड ड्युरा सिलेंडर लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन आज कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी त्यांच्या सोबत रायगड जिल्हाशल्यचिकित्सक डॉ . सुहास माने ,कर्जत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी , कर्जत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , शिवसेना संघटक भरतभाई भगत , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , नगरसेवक राहुल डाळिंबकर ,नगरसेवक संकेत भासे , नगरसेवक बैजू घुमरे , माजी नगरसेवक दीपक मोरे , वैद्यकीय अधिक्षक डॉ .संजीव धनेगावे , बालरोगतज्ञ डॉ.मनोज बनसोडे ,डॉ . नितीन चव्हाण , इंटेव्हीस्ट व भूलतज्ञ डॉ.वसंत भालशंकर ,छाती विकार तज्ञ डॉ.आकाश गोरे , स्त्रीरोगतज्ञ डॉ.रामकृष्ण पाटील , डॉ.सुप्रिया महामुनकर , डॉ.संगीता दळवी , डॉ.फड ,डॉ.अक्षय परजने , आदी मान्यवर , वैद्यकीय अधिकारी , नर्सेस , कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार महेंद्रशेट थोरवे म्हणाले की , उपजिल्हा रुग्णालयात समस्या व सोई सवलती विषयी जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार एक एक यंत्रणा येथे उभी रहात आहे . कोविड १९ शी सामना करताना अनेकांना प्राण गमवावे लागले ,म्हणून शासनाच्या सहकार्यातून ४ व्हेंटिलेटर ,तसेच आता कोविड सेंटर आय सीयु व ऑक्सिजन लिक्विड ड्युरा सिलेंडर ही अति महत्वाची यंत्रणेचे आज लोकार्पण सोहळा पार पडत आहे .कोरोनाच्या काळातील या आठ महिन्यातील डॉक्टर , नर्स ,कर्मचारी यांचे योगदान खूप मोठे आहे , अद्यापी लस आलेली नाही , मात्र जनजागृतीमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे .यावर प्रकाश टाकला . कर्जत तालुका आदिवासी बहुल भाग असल्याने येथे डॉक्टरांनी जादा काम करण्याची गरज आहे. येथे जास्तीतजास्त निधीची गरज असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयात रक्त साठा केंद्राची गरज आहे , ही समस्या लवकरच मार्गी लागेल , असे आश्वासन आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी दिले .

रुग्णालयात असलेले मतभेद बाजूला ठेवा , असे आवाहन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले . तुमचे योगदान म्हणजे देशसेवा आहे , कोरोना काळातील योगदान मोठे आहे , आपले नातेवाईक भेटत नव्हते ,त्या रुग्णाची सेवा तुम्ही केलीत हे तुमचे कार्य मोठे आहे ,म्हणूनच तुम्हा सर्वांचे कोविड योद्धे म्हणून डॉ , नर्सेस , अधिकारी , कर्मचारी यांचा सन्मान व्हावा अशी इच्छा प्रदर्शित करून सर्वांचे आम . महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते त्यांच्या सहीचे कोविड योद्धे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला .

यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुहास माने , कर्जत वैद्यकीय अधिक्षक संजीव धनेगावे यांनी देखील मार्गदर्शन केले . आयसीयू व ऑक्सिजन लिक्विड रुग्णांना कशाप्रकारे दिली जाते हे कोविड सेंटरमध्ये उपस्थित मान्यवरांना डॉ. आकाश गोरे व डॉ.वसंत भालशंकर यांनी सांगितले . यावेळी अनेक मान्यवर , नागरिक या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.