सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
जासई गावातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात न्हावा शिवडी सागरी सेतू संघटनेच्यावतीने (ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती, जासई) सिडकोला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, धर्मा पाटील, यशवंत घरत, जितेंद्र पाटील उपस्थित होते.
असिडकोच्या प्रकल्पाची आमच्या गावाच्या आजू बाजूला बरीच कामे चालू आहेत. ही कामे चालू करून बराच कालावधी झाला तरी येथील शेतकऱ्यांचे, गामस्थांचे प्रश्न तसेच पडून आहेत. येत्या पंधरा दिवसांच्या आत आपण आमच्या खालील मागण्यांची पुर्तता करावी अन्यथा नाईलाजाने आम्ही सर्व शेतकरी व ग्रामस्थ आपली चालू असलेली सर्व कामे बंद करू आणि सदर कामे बंद झाल्याने जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्व आपण व शासन जबाबदार असाल, असे समितीच्यावतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शेतकऱ्यांची जी जमिन संपादीत करणार आहात. त्या मोबदल्यात दिला जाणाऱ्या विकसित भुखंडाची जागा आणि कालावधी लिहून दयावा. तसेच भूखंड मिळण्याचा डेव्हलपमेंट चार्ज रद्द करावा. गरजेपोटी बांधलेली सर्व घरे नियमित करावीत आणि वाढीव गावठाण घोषित करावे. तसेच १९ -१२-२०१४ च्या एमटीएचएलच्या कराराची अंमलबजावणी करावी. सिडकोकडून आलेल्या जमिन संपादीत करण्याच्या नोटीसांवर ज्यांनी हरकत घेतली आहे त्यांच्या नोटीसा रदद कराव्यात. ज्यांची जमिन संपादीत केली जाईल त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर ज्यांची नावे आहेत त्या सर्वांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले कोणतीही नुकसान भरपाई न देता काम सुरू कली आहेत ती थांबवावी. प्रथम नुकसान शेतकऱ्यांना दयावी नंतर कामे चालू करावीत.
प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत. मैदान,समाजमंदिर, स्मशानभूमी, दफनभूमी आणि पिण्याच्या पाण्याची टाकी यासाठी जागा उपलब्ध करावी. जासई ग्रामपंचायतसाठी विकासनिधी मिळावा. पावसाळयात १३५ घरांमध्ये पाणी शिरले तरी नुकसान भरपाई मिळावी आणि गटाराची कामे व्हावीत. उरण-बेलापूर रेल्वे मार्गावर जासई रेल्वे स्टेशन करण्यात यावा. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा.पाटील ज्यु. कॉलेज जासईसाठी खेळाचे मैदान मिळावे. तसेच हुतात्मा भवन जासईचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत.








Be First to Comment