सिटी बेल लाइव्ह । उरण प्रतिनिधी । 🔶🔷🔶
शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस पत्रकार शेखर पाटील यांचा वाढदिवस काल रविवारी १ नोव्हेंबर रोजी सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.
उरण मेडिकल असोसिएशन दुर्ग मावळा व पत्रकार यांचे विद्यमाने सेंट मेरी शाळा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शेखर पाटील यांनी सर्व रक्तदात्याना पेन भेट दिली. हे रक्तदान कोविड रुग्णालयात उपचारासाठी देण्यात येणार आहे.
यावेळी उरण मेडिकल असोसिएशन चे डॉ सुरेश पाटील, डॉ मोरे, डॉ ठाकरे, डॉ पाटील सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, पत्रकार घनश्याम कडू, पत्रकार विरेश मोडखलकर, होमगार्ड चे अधिकारी नारायण पाटील यांनी शेखरपाटील यांचा रोपटे देऊन सत्कार केला. या दिवशी पुनाडे आदिवासी वाडी येथे लहान मुले पुरुष महिला याना कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी मुक्ताई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमनताई तोगरे समाजसेवक संग्राम तोगरे ,समाधान कातकरी हजर होते. समाजातील कोरोना योद्धे असलेल्या डॉक्टर, समाजसेवक, पत्रकार यांनी माझा वाढदिवस साजरा केला असे शेखर पाटील यांनी सांगितले तसेच मुक्ताई महिला मंडळ यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी सर्वाना खाऊ वाटप करण्यात आले.








Be First to Comment