भारतीय बौध्द महासभेच्या वर्षावास प्रवचन मालिका समारोपात कोविड योद्धयांचा सन्मान 🔶🔷🔶
https://youtu.be/leqvA3cq_bU
सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्षा: महाउपासिका मिराताई आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार: ऍड. बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
आंबेगाव या ठिकाणी कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून मानवतेच्या दृष्टिकोनातून मदतकार्य करणाऱ्या तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या काळात जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या योध्याचा या कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांनी भूषविले. वर्षावास मालिका समारोपाच्या निमित्ताने रायगड जिल्हा उत्तर संस्कार विभाग यांचे विद्यमाने ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिका २०२० चे देखील आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्व रत्न कसे? या विषयावर प्रवचनकार तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सहसचिव आयु. राजेश जी पवार साहेब केंद्रीय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सायंकाळी ४:००ते ५:०० पर्यत सदर प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपल्या मार्गदर्शनात या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे राज्य उपाध्यक्ष सुशिल वाघमारे यांनी संस्थेचे धम्म प्रचार प्रसाराचे कार्य देशातील प्रत्येक राज्यात सुरू असल्याचे स्पष्ट केले.
आपल्याला सर्वांगीण प्रगती साधायची असेल तर स्वाभिमानी, अभ्यासू व लढाऊ असलेल्या बाळासाहेब आंबेडकरांचे, राजगृहाचे नेतृत्व स्वीकारण्याची गरज आहे. असे वाघमारे म्हणाले. धम्म घराघरात व प्रत्येकाच्या मनामनात रुजविण्यासाठी आम्हाला एकजुटीने एकदिलाने काम केले पाहिजे, असे वाघमारे म्हणाले.
यावेळी संपदाताई चव्हाण, विजय कांबळे, चंद्रकांत सोनावणे व अन्य मान्यवरांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा पालक मंत्री सुशिल वाघमारे, जिल्हाध्यक्षा संपदाताई चव्हाण सरचिटणीस, विजय गायकवाड, उपाध्यक्षा उषाताई कांबळे, उपाध्यक्ष विजय मं.कांबळे संघटक एम.जी.शिंदे, पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, पांडुरंग जाधव, किशोर वाघमारे, चिंतामण कांबळे, दिनेश कांबळे, रमेश सोनावणे, भगवान शिंदे, उत्तम सावंत, महादेव सोनावणे, हरिचंद्र गायकवाड, रश्मीताई जाधव, सविताताई सुर्वे, भास्कर सुर्वे, पेण तालुका सरचिटणीस सचिन कांबळे, सचिव मंगेश कांबळे कोषाध्यक्ष नरेश गायकवाड, उपाध्यक्ष मनोज शिंदे आदींसह संपूर्ण रायगड जिल्हा उत्तर विभाग कार्यकारणी तालुका पदाधिकारी, विभाग, शहर शाखेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी या प्रवचन मालिकेत उपस्थित होते.
बाईट 1, सुशिल वाघमारे, उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र्र राज्य
बाईट 2, संपदा ताई चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष
बाईट 3, चंद्रकांत सोनावणे , पेण तालुका अध्यक्ष








Be First to Comment