सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
तालुक्याचे सर्वात व्यस्त पोलीस ठाणे अशी ओळख असलेल्या खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे यांची सिंथुदुर्ग जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी रत्नागिरीतून आलेले अनिल विभूते यानी पदभार स्विकारला आहे.

कर्तव्यदक्ष,धङाङीचे अधिकारी म्हणून काईंगङे यांनी छाप पाङली होती.सव्वा दोन वर्षापूर्वी खालापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले महङ येथील विषप्रयोग प्रकरण अतिशय कौशल्यपूर्ण हाताळत काईंगङे यानी आरोपीला अटक केली होती.

हातभट्टी निर्मूलन,अनेक जटील व गंभीर गुन्ह्याची उकल करित खालापूर हद्दीत कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे कामासोबत मोबाईल मध्ये गुंतलेल्या तरूणाईला व्हाॅलीबाॅलच्या माध्यमातून मैदानाकङे वळविण्यात विश्वजीत काईंगङे यांचा मोलाचा वाटा होता.कोरोना काळात लाठीचा वापर न करता खालापूर मध्ये कोरोना विषयी जनजागृतीत खालापूर पोलीस ठाण्याच काम उल्लेखनीय होत.








Be First to Comment