Press "Enter" to skip to content

रसायनी येथे जनकल्याण समितीच्या रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घघाटन

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये रसायनी रिस भटवाडी  येथे रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घघाटन समितीचे कोकण संभाग कार्यवाह अविनाश धाट यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे कुलाबा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद जोशी होते.अविनाश  धाट यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रूग्णोपयोगी साहित्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी प्रास्ताविकामध्ये रुग्णांना आवश्यक असणारे फाऊलेर बेड ,व्हील चेअर ,वॉकर, कमोड चेअर, कुबड्या, एअर बेड हे साहित्य या केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.

त्यानंतर संभाग कार्यवाह अविनाश धाट यांनी जनकल्याण समितीने कोरोना आपत्तीमध्ये केलेल्या कामाचे तसेच अन्य आपत्तींमध्ये केलेल्या कामाची माहिती  तसेच समितीच्या वतीने चालणाऱ्या सेवाकार्यांची माहितीही दिली. समिती शिक्षण,आरोग्य, संस्कार, आपत्ती ,स्वावलंबन, कृषी आणि पूर्वांचल विकास या क्षेत्रांमध्ये काम करत असल्याचे धाट यांनी सांगितले.नव्याने सुरू होत असलेल्या रूग्णोपयोगी साहित्य केंद्राचा रसायनी आणि परिसरातील नागरिकांना चांगला उपयोग होईल असेही त्यांनी शेवटी सांगितले.

 या कार्यक्रमासाठी जनकल्याण समितीचे  कार्यवाह रविकिरण काळे, जिल्हा कार्यवाह नितीन भावे , रा.स्व. संघाचे जिल्हा सहकार्यवाह श्रीरंग काणे,आरोग्यरक्षक प्रमुख भगवान भगत , मोतीराम पादीर, प्रदीप जोशी, ॲडव्होकेट श्रीराम ठोसर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रदीप जोशी यांनी शेवटी आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.