कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सेवा होणार सुरू ! 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔶🔷🔶
राज्य शासनाचे रायगड आरोग्य विभागाचे कर्जतमधील रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असतानाही व येथील बहुसंख्य आदिवासी भाग पहाता येथील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असणे क्रमप्राप्त असताना आजवर येथे अनेक समस्या पहाण्यास मिळाल्या . मात्र कोरोना काळात येथील असणाऱ्या त्रुटी चव्हाट्यावर आल्याने जिल्हा आरोग्य विभागाने येथे लागणाऱ्या सोई – सवलती देण्यास सुरुवात केली आहे .
येथे व्हेंटिलेटर आय सी यु रुमसाठी लागणारे ऑक्सिजन सेवेचे काम चालू असून सोमवारी याचे लोकार्पण होणार आहे , त्यामुळे तूर्ततरी ” देर है , मगर दुरुस्त है , अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत असून रुग्णांना या सेवेमुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे .
कर्जत तालुक्यात यापूर्वी व आता कोरोना काळात ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या , त्यातच व्हेंटिलेटर सेवा ऑक्सिजन यंत्रणा नसल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नव्हती , म्हणून पर्यायी मार्ग रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत , यामुळे रुग्णांचा मोठया प्रमाणात खर्च होत असे .तर दुसरा पर्याय म्हणजे पनवेल – नवी मुंबई व मुंबईकडे रुग्णांना हलविण्यात येत असे , मात्र त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असून अशा घटनाही घडल्या.
स्वर्गीय पत्रकार संतोष पवार यांचे वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या दुर्दैवी निधनामुळे जिल्हा आरोग्य विभाग जागे झाले व तातडीने व्हेंटिलेटर मशीन पाठविण्यात आल्या मात्र त्या ही मशीन धूळ खात पडल्या असल्याचा बातम्या झळकल्यावर या मशीनसाठी लागणारी सुसज्ज ऑक्सिजन यंत्रणा लावून आय सी यु रूम तयार झाली आहे . आरोग्य विभागाची ही यंत्रणा कोरोना संपण्याच्या म्हणजे रुग्ण कमी होत चालल्याचे चित्र असताना ” वराती मागून आलेले घोडे ” असले तरी , देर है , दुरुस्त है , असे असून यामुळे यापुढे रुग्णांना या ऑक्सिजन यंत्रणेमुळे दिलासा मिळणार आहे , व योग्य उपचार मिळणार आहेत , हे मात्र खरे !







Be First to Comment