Press "Enter" to skip to content

कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवादन सभा

इंदिराजीं मुळेच भारत सक्षम झाला तर सुर्वेंनी कर्जतच्या विकासाला दिशा दिली : श्रद्धाताई ठाकूर 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷

काँग्रेसने 70 वर्षात काय केले असा प्रश्न भाजपवाले विचारत आहेत ? काँग्रेसने कंपन्यांची स्थापना केली म्हणून तर तुम्ही त्या विकण्याचा घाट घालत आहात. बांगला देश निर्मिती, राष्ट्रीयीकृत बँका आदी कामे काँग्रेसच्या राज्यात झाली. शेती कसणारा शेतकरी झाला अशी एक ना अनेक कामे काँगेसने केली आहेत. इंदिरा गांधीं मुळेच भारत सक्षम झाला. हे कटू सत्य आहे. कर्जतच्या विकासाची दिशा माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या मुळे मिळाली. ते आमदार झाल्यावर त्या विकासाला चालना मिळाली.’ असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षा श्रद्धाताई ठाकूर यांनी येथे केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कर्जतचे आमदार स्व. तुकाराम सुर्वे यांच्या पुण्यतिथी निमित्त कर्जत शहरातील आमराई येथे कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवादन सभेचे तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड. श्रद्धाताई ठाकूर यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी व माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले. आणि या दोघांनाही अभिवादन केले.

याप्रसंगी आदिवासी प्रदेश काँग्रेस चिटणीस मनोहर पादीर, इंटकचे जिल्हाध्यक्ष किरीट पाटील, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, धंनजय चाचड, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे, नवनिर्वाचित महिला तालुकाध्यक्ष दीपाली पाटील, नगरसेवक शिवाजी शिंदे, दीपाली म्हात्रे आदी उपस्थित होते.

ठाकूर यांनी, ‘दिपाली पाटील यांना कर्जत तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून जाहीर केले व जास्तीत जास्त महिलांना काँग्रेस मध्ये सक्रिय करण्याचा प्रयत्न करा. असे सूचित करन इंदिराजींची पाऊले या कर्जत भूमीला लागले त्याचा आंनद असून केवळ तुकाराम सुर्वे यांच्या मुळेच त्या कर्जतला आल्या होत्या. त्यामुळे सुर्वे काय होते? त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती? याचा अंदाज येतो.’ असे सांगितले.

कर्जत शहर काँगेस अध्यक्ष इरफान अत्तार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी प्रास्ताविकात, इंदिरा गांधी यांच्या कार्याची तसेच तुकाराम सुर्वे यांच्या कार्य पद्धतीची आठवण करून देऊन ‘तालुक्यात पक्ष वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे.’ असे आवाहन केले. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी ‘इंदिरा गांधींच्या व राजीव गांधींच्या हत्ये नंतरही जीवाची पर्वा न करता सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. विरोधक म्हणतात काँग्रेस संपली पण काँग्रेस कधीच संपणार नाही उलट काँग्रेस मध्ये नवी उभारी येत आहे. माथेरान मध्येही या निवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळेल.’ असा विश्वास व्यक्त केला.

मनोहर पादीर यांनी ‘आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्या साठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यांच्या साठी आदिवासी प्रकल्प कार्यालयातून विविध योजना आणून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी व त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे. असे स्पष्ट केले. किरीट पाटील व हेमराज म्हात्रे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन सुभाष मदन तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.

यावेळी नयना घरत, सुजाता पाटील, पुंडलिक भोईर, जकीर नझे, निवृत्ती मोरे, संजय सुर्वे, संदीप शिंदे, मोहन सुर्वे, प्रमोद राईलकर, सुनील शिंदे, लखुबुवा ऐनकर, दिनेश रावळ, इस्माईल दिवाण, भीमराव जाधव, पुष्पा देशमुख, सागर सुखदरे, असिफ अत्तार आदीं सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.