ज्येष्ठ पत्रकार नवीनभाई सोष्टे यांची मागणी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶
उच्च प्रतीच्या अभिनयाचा ज्येष्ठ राजा अमिताभ बचन यांचा आवाज आपण दुसरीकडे फोन लावता क्षणीच १० मिनिटे घुमत राहतो. या अडथळ्यांमुळे महत्वाचे काम असले तरी भाषण होईपर्यंत अनेकांना थांबावे लागते. एखादा आजारी माणूस किंवा अपघात ग्रस्तासाठी रुग्णवाहिका बोलवायची असेल तर यांचे भाषण संपल्या शिवाय पुढचा कॉल लागत नाही. याच दरम्यान उपचार वेळेवर मिळाले नाही आणि माणूस दगावला तर त्याला अमिताभ जबाबदार राहणार का ?
कोरोनाचा प्रचार आणि अमिताभ ची क्लिप केवळ चार दिवस ठीक होती पण गेले सात महिने हा आवाज अनेकांना हैराण करत आहे. तीन वर्षांच्या लहान मुलांनाही कोरोना आणि त्याचे दुष्परिणाम कळतात हे लक्षात घेतले तर प्रत्येक कॉल मागे अमिताभ यांच्या व्याख्यानाची काही गरज आहे का ? त्यामुळे कृपया त्याने आपले हे ज्ञान पाजळणे तूर्तास बंद ठेवावे अन्यथा लोक त्या त्या मोबाईलच्या कंपनीवर बहिष्कार टाकतील हा संदेश मी येथे देत आहे असे मत नागोठण्यातील ज्येष्ठ पत्रकार व रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवीनभाई सोष्टे प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलतांना व्यक्त केले आहे.







Be First to Comment