Press "Enter" to skip to content

उरणमध्ये रक्तदान शिबिरात ९४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिटी बेल लाइव्ह । उरण ।घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

उरणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ९४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. रक्तदान श्रेष्ठदान अशा भावनेतून केले जाणारे रक्तदान या रक्तदानाने अनेकांना नवजीवन मिळते ही परंपरा अनेक संघटनांनी सुरू ठेवली आहे. आज देशावर कोरोना सारख्या महामारीचे संकट असताना देखील आपण समाजाचे काही देणे लागतो या ध्येयाने आपल्या जिवाची काळजी घेवूनच आजचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन उरणमध्ये सर्वाधिक रक्तदान करणारे उल्हास मोकाशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

उरण मेडिकल वेल्फेअर असोशीएशन ,नव परिवर्तन गृप व दुर्ग मावळा प्रतीष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते ३ या वेळेत रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्री साई ब्लड बँक पनवेलने रक्तदान करण्यास सहकार्य केले. रक्तदान शिबिरास माजी आमदार मनोहरशेठ भोईर, संतोष ठाकूर, गणेश शिंदे, बळीराम ठाकूर, कौशिक ठाकूर, गणेश म्हात्रे आदींनी भेट दिली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी उरण मेडिकल वेल्फेअर असोशीएशन, नव परिवर्तन गृप व दुर्ग मावळा प्रतीष्ठानचे पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली. सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.