सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷
पोयंजे विभागातील खानावले येथील उद्योजक मोहनशेठ लबडे यांनी मावळचे खासदार आप्पा बारणे ,उरण मतदार संघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
पोयंजे विभागातील खानावले येथे पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन ३१ आॕक्टोंबर रोजी सायंकाळी करण्यात आहे होते. प्रथमतः मावलचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याहस्ते गणरायाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते धत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पक्ष प्रवेश सोहळ्यास सूरूवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक ह.भ.प.अनंता पाटील यांनी केले.

पोयंजे विभागात हा पक्ष प्रवेश सोहळा अतिशय उर्जादायक ठरला असल्याचे उपस्थिताच्या मुखातुन उद्गार निघत होते.यावेली 470 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.उद्योजक मोहनशेठ लबडे,काशिनाथ ठाकूर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीरनामा पक्ष प्रवेश केल्याने पोयंजे विभागात शिवसेनेची ताकद वाढविल्याने विरोधकांचे धाबे दणाणुन गेले आहेत अशी विभागात चर्चा रंगत आहे.यावेली माजी आमदार मनोहर भोईर यांनी मोहनशेठ लबडे यांना शिवबंधन बांधले.

या पक्षप्रवेश सोहळ्यास मावळचे खासदार आप्पा बारणे,उरण मतदार संघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर ,चौक जिल्हा परिषद सदस्य मोतिराम ठोंबरे, शिवसेना पनवेल तालुकाध्यक्ष रघुनाथ पाटील, तालुका संपर्क प्रमुख अनंता पाटील,पोयंजे जिल्हा परिषद विभागप्रमुख नितिन पाटील,माजी उपसभापती देविदास पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर देशमुख, गणेश खुटले,भास्कर पाटील, सुनिल पाटील, गिरीश पाटील,वैभव पाटील,मितेश पाटील,समीर पाटील,कल्पेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान शिवसेना पक्ष वाढीकरिता मी प्रयत्नशील राहणार असल्याचे मोहनशेठ लबडे यांनी सांगितले.यावेली सोशल डिस्टीक्शनचे तंतोतंत पालन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले.







Be First to Comment