जोपर्यंत सरपंच आहे तोपर्यंत जनतेचा पैसा हा जनतेसाठीच खर्च करणार : सरपंच नौशाद दळवी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । मुरूड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶
व्यायामशाळा ही तुमची आहे.त्याचे जतन करणे हे तुमच्या हाती आहे.सरपंच या नात्याने मी केवळ पालक आहे.जोपर्यंत सरपंच म्हणून मी कार्यरत आहे तोपर्यंत जनतेचा पैसा हा जनतेसाठीच खर्च करणार असल्याचे प्रतिपादन बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांनी मौजे बोर्ली येथे व्यायामशाळा उद्घाटनप्रसंगी केले.सदर व्यायामशाळेचे उद्घाटन निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुरूड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते, ग्रामपंचायत सदस्य जगीता कोटकर, नम्रता शिंदे,बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती,सामाजिक कार्यकर्ते अजय सोडेकर,भाजपचे माजी तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी,स्वप्नील रामनाखवा, जीवन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच नौशाद दळवी यांनी सांगितले की,बोर्ली गावातील मुले ही व्यायामासाठी दुसऱ्या गावात जात होती.मात्र लक्षात आले की,तेथे सामान असूनही नियोजन मात्र शून्य असल्याने मुलांना व्यायाम करता येत नव्हते. ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा मुलांना शब्द दिला होता की,त्यावेळी सामान हे दुसऱ्या गावातील व्यायामशाळेत गेले असलेतरी आपल्या व्यायामशाळेसाठी सामान घेऊन येऊ.मी माझा दिलेला शब्द पूर्ण केला आहे.मी माझ्या कारकिर्दीत छोटीशी सुरवात करून दिली आहे।या छोट्याशा माध्यमातून आपण पुढे जाऊन प्रगती साधणार आहोत.भविष्यात खूप सामान आपण व्यायामशाळेसाठी आणणार आहोत.या व्यायमशाळेची मुहूर्तमेढ ही अंबाजी यांनी रोवली आहे.त्यांनी व्यायमशाळेसाठी सामानही आणले होते. मात्र ते सामान चोरीस गेल्याने व्यायाम करण्याची परंपरा ही खंडित झाली होती.ही व्यायामशाळा तुमची आहे.तुम्हीच या व्यायामशाळेचे मालक आहात. ही व्यायामशाळा तुम्हालाच चालवायची आहे यासाठी नियमावली तयार करून घ्या.असा सल्लाही दळवी यांनी दिला.







Be First to Comment