Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यात कृषी सेवा केंद्राचा तपासणी दौरा….

मोहीम कृषी अधिकारी मुनिर बाचोटीकर यांनी केली कृषी सेवा केंद्राची  तपासणी 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶

रायगड जिल्ह्यात मोहीम  कृषी आधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी प्रत्येक कृषिसेवा सेवा केंद्रांची ची तपासणी सुरू करण्यात आले असून  त्यासाठी तालुकानिहाय नियोजन तयार करणार आहे. तसेच कृषी सेवा केंद्रांची तपासणी करताना त्यांच्याकडे ठेवण्यात आलेले मालाची नोंदणी केली आहे का ? त्यांच्याकडे आवश्यक प्रमाणपत्र आहे का ? संबंधितांकडे ओ फॉर्म आहे का ? हे पाहिले जाणार आहेत.

तपासणी करून दुकानदारांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नसून केवळ संपलेली औषधे हे बंदी घातलेली औषधे विकली जाऊ नयेत एवढाच उद्देश आहे. त्यामुळे तपासणी करताना कृषी सेवा केंद्राने घाबरून जाऊ नये. असे स्पष्ट रायगड जिल्हा मोहीम कृषी अधिकारी मुनीर बाचोटीकर याने सांगितले आहे.

मोहीम कृषी अधिकारी यांनी आज पेण तालुक्यातील वाकरूल येथील श्री समर्थ कृपा कृषी सेवा केंद्र ला भेट देऊन त्यांना कीटनाशक अधिनियम 1968 नियम 1971 नुसार तसेच प्रत्यक्ष साठा रजिस्टरमध्ये नोंद ठेवणे.कीडनाशकाची विक्रीचा बिलांचा तपशील ठेवणे.यासारख्या सूचना देण्यात असून शेतकऱ्यांना वेळोवेळीं कृषी सेवा केंद्रांनी मार्गदर्शन करावे असे आवाहन रायगड जिल्हा मोहीम कृषी अधिकारी यांनी केले आहे. 

  मुनीर बाचोटीकर यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पदवीत्तर शिक्षण घेऊन त्यांनी तालुका कृषी अधिकारी वैजापूर येथे तीन वर्षे काम पाहिले तर नंतर औरंगाबाद येथे किटकनाशक चाचणी प्रयोगशाला मध्ये विश्लेषण रसायन शास्त्र म्हणून पाच वर्षे काम पाहत होते तसेच अहमदनगर मध्ये पाच वर्ष कृषी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळ  होता त्यानंतर 12/ 10 /2020 रोजी रायगड जिल्हाचा  मोहन कृषी अधिकारी म्हणून कार्यभार हातात घेऊन त्याही संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्राची  तपासणी करण्याची सुरुवात केली आहे.

आज पेण तालुक्यातील वाकरूला येथील श्री समर्थ कृपा कृषी सेवा केंद्राला व परिसरातीळ इतर दुकानाची तपासणी करण्यात आली आहे. असून त्यांना किटकनाशके अधिनियम 1968 नियम 1971 नुसार सूचना आल्या आहेत.

मुनिर बाचोटीकर 
रायगड जिल्हा मोहीम कृषी अधिकारी

   

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.