Press "Enter" to skip to content

आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते न्यू भुमिका कलेक्शनचे उद्घाटन

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷

रोहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेसमोर न्यू भुमिका कलेक्शनचे शानदार उद्घाटन विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते नुकतेच शानदाररित्या करण्यात आले.

मराठी उद्योजक म्हणून नावारूपाला येत असलेल्या प्रकाश साळुंखे यांनी व्यवसायात एक दमदार पाऊल टाकून काही वर्षापूर्वी रोहे दमखाडी येथे अशाचप्रकारचे कपड्यांच्या दुकानाची ओपनिंग करून प्रारंभ केला.तर प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाचे जोरावर त्यांनी रोहे शहरातच नवीन न्यू भूमिका कलेक्शनला सुरुवात केली आहे.

आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सदर कलेक्शनचे शानदार उद्घाटनही करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, रा.काँ.युवक शहराध्यक्ष अमित उकडे,युवा नेते सचिन चाळके,प्रकाश कोळी,निलेश शिर्के, महादेव लोखंडे, किल्ला सरपंच योगेश बामुगडे, उद्योजक प्रदीप मेहता,प्रकाश साळुंखे,राहूल शेडगे,म.गांधी तंटामुक्त अध्यक्ष शेळके,अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.