Press "Enter" to skip to content

रोहे-कोलाड मार्गावरील खड्डे बुझविण्याचे कामास प्रारंभ

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷

महाकाय खड्ड्यांमुळे बहुचर्चित असलेल्या रोहे-कोलाड मार्गावरील खड्डे बुझविण्याचे कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षे या मार्गावरील पावसाळ्यात पडत असलेले खड्डे म्हणजे वाहन चालक व प्रवासी वर्गाच्या डोकेदुखीचा विषय होऊन बसला आहे. तर दरवर्षी पावसाळ्यात पडत असलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत असल्याने नाहक खड्ड्यांचा त्रास प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. चालू पावसाळ्यात देखील ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे सारेच हैराण परेशान झाले होते.कधी एकदा या मार्गाचे पक्के डांबरीकरण व काँक्रीटीकरण होतय असे सा-यांनाच वाटत आहे.

पावसाळा ऋतू आता संपल्यातच जमा असल्याने व प्रवासी वर्गाला होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन संबंधित प्रशासन यंत्रणेने खड्डे बुझविण्याचे कामास प्रारंभ केला असल्याने प्रवासी वर्ग व वाहनचालक यांना तात्पुरते स्वरूपात दिलासा प्राप्त झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.