- राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांची पत्रकार परिषदेत माहिती 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷
खासदार सुनील तटकरे व महाविकास आघाडीचे पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान सहन केले जाणार नाही असा ईशारा राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष सुरेश लाड, काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष आर. सी. घरत, शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, संतोष शृंगारपुरे, प्रशांत पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे , महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, माजी नगरसेवक जितेंद्र ठाकुर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, राष्ट्रवादीचेेे पेण शहर उपाध्यक्ष विशाल बाफना, प्रसाद देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेेना व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना लाड म्हणालेकी, पेणच्या मुख्याधिकारी यांच्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटनेते व मुख्याधिकारी यांच्यातील वाद न्याय प्रविष्ट आहे. या वादाचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. महिलांशी वागताना योग्यरीत्या वागावे माता-भगिनींचा योग्य आदर राखावा असाही सल्ला यावेळी लाड यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पेण येथे बेकायदेशीरपणे काढलेला मोर्चा व घेतलेल्या सभे विरोधात पोलीस प्रशासन कारवाई करणार असल्याचे सुचवत त्यांनी केले. यावेळी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचा या पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला.
देवेंद्र फडवणीस हे राज्यात मुख्यमंत्री होते तसेच त्या वेळेला केंद्रातही भाजपची सत्ता होती तरीही देवेंद्र फडवणीस व भाजपने पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून दिला नाही. या संदर्भात खासदार तटकरे यांनी लोकसभेत आवाज उठवून सदरची बँक विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे व त्यासाठी प्रयत्नशील आहेत. खासदार शेतकऱ्यांची शैक्षणिक व राजकीय पात्रता काय आहे याची कल्पना संपूर्ण देशाला आहे त्यांची पात्रता जाणून घ्यायला भाजपने त्यांना आयुष्य खर्ची करावे लागेल असाही टोला यावेळी त्यांनी लगाविला.
सुशांतसिंग राजपूत प्रकरण व मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणावत या सिनेअभिनेत्रीला भाजपने व राज्यपाल यांनी साथ दिली. भाजपाचे दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावेळेला कंगना राणावत हिच्या वक्तव्याचा निषेध करायला पाहिजे होता. भारतीय जनता पक्षाचे नेते फक्त राजकारण करीत आहेत. कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारने राज्य सरकारला कोणतीही मदत केली नाही. राज्य सरकारच्या हक्काचे जीएसटीचे कोट्यावधी रुपये आजपर्यंत देण्यात आले नाही.
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील म्हणाले की राज्यातील सत्ता हातातून गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे नेते प्रकाशझोतात राहण्याकरिता महाआघाडीच्या नेत्यांवर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत आहेत. महाआडीचे सरकार लवकरच पडेल अशी आरोळी ठोकतात. या भाजपच्या वैफल्यग्रस्त नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरामेळाव्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे खुले आव्हान दिले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बाटगा माणूस असल्याची अशी टीका बबन पाटील यांनी केली.







Be First to Comment