Press "Enter" to skip to content

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास मालिकेचा शानदार समारोप

  • बुद्ध आणि आंबेडकरांच्या विचारांची शिकवण देणारी ही संस्था — सुशिल वाघमारे 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶

भारतीय बौद्ध महासभेचे कार्य देशातील अनेक भागांमध्ये सुरु असून आषाढ ते अश्‍विन पोर्णिमा या कालावधीत वर्षावास मालिका सुरू असते. या मालिकेत बौद्ध धम्माचे प्रवचन दिले जाते. मात्र देशावर आलेले कोरोनाचे संकट पाहता अनेक भागात ॴॅनलाईन प्रवचन घेण्यात आले. पण पेण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वर्षावास मालिकेच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिकवण देणारी ही संस्था घराघरात पोचविण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे संस्कार उपाध्यक्ष सुशिल वाघमारे यांनी पेण येथे केले.

भारतीय बौद्ध महासभा पेण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोप आज पेण आंबेगाव येथे करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संस्कार उपाध्यक्ष सुशिल वाघमारे, विजय गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण, सचिव आशाताई गांगुर्डे, वंदना गायकवाड,उषाताई कांबळे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे,शहर अध्यक्ष आनंद जाधव, नगरसेविका प्रतिभा जाधव माजी नगरसेवक पांडुरंग जाधव, जिल्हा संघटक मारुती शिंदे प्रवचनकार संतोष जाधव, सचिन कांबळे, नरेश गायकवाड, मंगेश कांबळे आदि पदाधिकाऱ्यांसह नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही संस्था घटनेच्या चौकटीत राहून काम करीत आहे. बहूजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी समाज हिताची कामे हाती घेतली आहेत त्यामुळे तरुणांनी नुसती चळवळ न चालवता राजकीय हक्क सुद्धा प्राप्त केले पाहिजेत.येणा-या काळात पेण मध्ये अधिक जोमाने संघटना उभी राहिली पाहिजे असे त्यांनी शेवटी सांगितले. तर यावेळी बोलतांना तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांनी सांगितले की समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत मी पोहचणार आहे.

या संस्थेचे कार्य चालवित असतांना आपल्या मनाशी खूणगाठ बांधून येणाऱ्या संकटाला सामोरे जाता बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे विचार तेवत ठेवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या वतीने कोरोनाच्या काळात सामाजिकदृष्ट्या काम करणारे अंतोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा पत्रकार राजेश कांबळे, धम्मशिल सावंत, पोलिस पाटील सरीता रणपिसे, निकीता सताणे, अर्चना लाटे, सुरेश सोनावणे, मंगेश गायकवाड, गणेश ढेणे यासह सामाजिक, धार्मिक राजकीय कार्यकर्ते, महिला आदिंचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करतांना त्यांना शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.