राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । याकूब सय्यद । 🔷🔶🔷
रायगड जिल्ह्या दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागोठणे येथील प्रसिद्ध व जागरूक असलेली हजरत मीरा मोहिद्दिन वल्ली अवलिया बाबाची दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले तसेच नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्राम सचिवालयाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे सभागृहासाठी 25 लाखाचा निधी देण्याची घोषणा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. येथे भव्य दिव्य सभामंडप उभारुन तो सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी खुला असावा असे आवाहनही सत्तार यांनी केले. नागोठणे गावाच्या विकासासाठी कोणताही परिस्थितीत निधी कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
गावाच्या विकास कामाची देखील त्यांनी माहिती करून घेतली. यावेळी समस्त ग्रामस्थांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेचे आमदार पक्षसंघटना मजबुतीसाठी निवडून आणावे असे आव्हान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. त्यावेळी आमदार महेंद्र दळवी, रोहा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी राठोड, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, ग्राम विकास अधिकारी दिवकर, नागोठणे ग्रामपंचायती सरपंच डाॅ मिलिंद धात्रक, उपसरपंच सुरेश जैन, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, सौ. मंगी कातकरी, मोहन नागोठणकर, ज्ञानेश्वर साळुंखे, किर्तीकुमार कलस, आसिफ मुल्ला, समीर भिकन, प्रकाश कांबळे, मजीत लांबते, बाळू रटाटे, संजय काकडे उपस्थित होते.







Be First to Comment