सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔶🔷
ग्रुप ग्रामपंचायत भालिवडी कार्यालय येथे ग्रामपंचायतची मासिक सभा संपन्न झाली.या प्रसंगी विविध विषयांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.सभेत रायगड भूषण केंद्रप्रमुख नारायण सोनवणे माथेरान यांनी कोव्हिड काळात सरपंच,उपसरपंच व सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले .
त्यांनी कोव्हिड विषयक ग्रामपंचायत हद्दीतील गावातून मार्गदर्शन करताना सहकार्य केलेले आहे. तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे अविरत स्मरण राहावे म्हणून आपल्या हद्दीतील चौकाना नामकरण करण्याचे निवेदन नारायण सोनवणे यांनी सरपंच राजेन्द्र गंगावणे यांना दिले.हा विषय स्तुत्य आहे.याची ग्रामपंचायत कार्यवाही करेलच असे अनुमोदन देताना उपसरपंच राहुल कार्ले यांनी सर्व मान्यवरांच्या वतीने शब्द दिला.
सभेसाठी ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच सह सदस्य मनोहर वाघमारे, माधुरी माळी,सौ मंजुळा पवार , शैला भोज, प्रमिला पाटील, साजिर कर्णेकर व ग्रामसेवक पर्तोले व वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment