Press "Enter" to skip to content

पालीत कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून साधेपणाने ईद साजरी

कोरोनाचे संकट लवकर टळो, सुखाचे दिवस जगायला मिळो, पालीत ईद ए मिलादुम नबी उत्सवात मुस्लिम बांधवाची दुवा 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

संपूर्ण देशावर कोरोना संकटाचे सावट असल्याने याकाळात सर्व सण व उत्सव शांततेत साजरे करण्यात आले. सुधागड तालुक्यातील पालीत दरवर्षी ईद ए मिलादुम नबी जुलूस कार्यक्रम उत्साहात साजरा होतो. यानिमित्त पाली शहरांत भव्य मिरवणूक देखील काढण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना महामारीचे सामाजिक भान राखत ईद ए मिलादुम नबी सण साधेपणाने व शासन नियम पालन करून साजरा करण्यात आला.

मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करून संपूर्ण मानवजातीला वेठीस धरणारे
कोरोनाचे संकट लवकर टळो व सर्वाना सुखाचे दिवस येवोत अशी दुवा केली. इ.स. पुर्व 571 मध्ये पैगंबर साहब हजरत महम्मद सल यांचा जन्म झाला. जन्मदिनाचे औचित्य साधून यादिवशी ईद-ए- मिल्लादुन्नबी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विश्व शांति दिवस साजरा केला जातो.

यावेळी बशीरभाई परबळकर यांनी या दिवसाचे महत्व व पावित्र्य विषद केले. पाली सुधागडातील मुस्लीम समाज मागील अनेक वर्षापासून हा सण शांततेत व उत्साहवर्धक वातावरणात साजरा करीत आहे. असे परबळकर म्हणाले. ईद ए मिल्लादुन्नबी हा सण अत्यंत महत्वाचा दिवस असून संपुर्ण जगभरात महंम्मद पैंगब्बर साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम साजरा केला जातो. इस्लाम म्हणजे शांती. इस्लाम हा शांतीचा संदेश देणारा धर्म आहे. सामाजिकदृष्ट्या मानवी उत्कर्ष साधण्याच्या स्तरावर सर्वोत्तम संदेश इस्लाम धर्मात देण्यात आला आहे.

महंम्मद पैगंबर साहेबांच्या माध्यमातून 1400 वर्षापुर्वी महिलांना सर्वाधिक सन्मान व अधिकार देण्यात आले. पैंगंबर हे केवळ मुस्लीम धर्मापुरते मर्यादीत नव्हते. तर ते समस्त माणव जातीचे होते. त्यांनी स्वताच्या कृतीतून समाजात आदर्श निर्माण केला. त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणार्थ महान उपदेश दिला आहे. त्यामुळे ईद ए- मिलादुन्नब्बी या सणाचे अनन्यसाधारण असे महत्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.