सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶
ताम्हाणी घाटाच्या एका बाजूला मोठा डोंगर आहे. या डोंगरावर अनेक जंगली प्राण्यांचे वास्तव्य असते. या जंगली प्राण्यां बरोबर माकडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. जंगलातील कंदमुळे खाऊन आपली उपजीविका करत असतात. मात्र जंगल नष्ट झाल्यामुळे या माकडांचा अन्नाचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे ही माकडे आता अन्नासाठी रस्त्यावर उतरली आहेत.
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे येणारे प्रवासी कमी झाले आहेत. ताम्हाणी घाटातून रात्रंदिवस लहान मोठ्या गाड्या धावत असतात अनेक प्रवासी माकडांना खाद्य टाकत असल्यामुळे त्यांना अन्नाची कमतरता भासत नव्हती. मात्र लॉकडाऊन मुळे क्वचितच प्रवासी जा-ये करत असल्यामुळे रस्त्यावर येऊन सुद्धा त्यांना अन्न मिळत नसल्यामुळे उपासमार होत आहे.
कोलाड सुतारवाडी मार्गे पुणे जवळचा मार्ग असल्यामुळे पुण्याकडून येणारे आणि पुण्याकडे जाणारे असंख्य प्रवासी असल्यामुळे असे प्रवासी माकडांच्या दर्शन झाला की त्यांना खाण्यासाठी खाद्यपदार्थ टाकत असतात. त्यामुळे माकडांना दररोज अन्न मिळत होते. सकाळ झाली की माकड रस्त्यावर उतरतात. तेथे प्रवासी त्यांना खाद्य पदार्थ टाकतात. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनामुळे या मार्गावरून जाणारी येणारी वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरून कोणीही फिरकले नाही त्यामुळे माकडांची उपासना झाल्यामुळे माकड आता रस्त्यावर आलेले आहेत.
ऑक्टोबर महिन्यापासून ताम्हाणी घाटातून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची थोड्या प्रमाणावर वर्दळ सुरू झाल्यामुळे रस्त्यावर उतरत असलेल्या माकडांची आता अन्नाची सोय होऊ लागले आहे. त्यांची उपासमार होणार प्रमाणावर थांबलेली दिसत आहे.







Be First to Comment