शिवसेना आक्रमक ! कंपनीच्या टॉवरकडे धाव : बारा दिवसांचा अवधी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । कुणाल माळवदे । 🔷🔶🔷
श्रीवर्धन तालुक्यातील मोठी बाजारपेठ बोर्ली पंचतन , दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये व्होडाफोन-आयडिया, जिओ या कंपन्यांकडून देण्यात येत असलेली मोबाईल नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
मागील वर्षभरामध्ये या कंपन्यांची सेवा सुधारत नसल्याने व कंपनीला ग्राहकांच्या तक्रारींकडे बघण्यासाठी वेळच नसल्याने शिवसेना आता अधिक आक्रमक झाली आहे. मोबाईल टॉवर असणाऱ्या ठिकाणी धडक दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवा पुढील दिवसात निश्चित सुरळीत होईल असे आश्वासन दिल्याने शिवसैनिक शांत झाले.
मात्र पुढील १० नोव्हेंबर पर्यंत सर्व मोबाईल कंपन्यांची सेवा चांगल्या प्रकारे सुरू झाली नाही तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी अधिकाऱ्यांजवळ झालेल्या चर्चेदरम्यान दिला .







Be First to Comment