Press "Enter" to skip to content

कुशीतली उशी

कुशीतली उशी

गजबजलेल्या जगातून,
ताठ मानेने चालताना,
असतो तोरा आपल्या नाकावर…
पण घरी आल्यावर तो थकवा मात्र जातो,
कुशीतल्या उशीवर डोकं ठेवूनच.

एकीकडे अभ्यासाचा तर दुसरीकडे करियरचा,
नोकरीचा, नात्यांमधल्या रुसव्या फुग्यव्यांचा…
कशाकशाचा भार नसतो हो आपल्या डोक्यावर?
पण अशाच वेळी, आपला भार हलके करणारी, अलगदपणे आपल्यात सामावून घेणारी, आठवते मला माझी कुशीतली उशी!

वादळाप्रमाणे कोसळणारे अश्रू निमुटपणे शोषून घेणारी,
गालातल्या गालात हसलेलं ते
गोड गुपित जपणारी,
असंख्य निरनिराळ्या स्वप्नांची,
एकमेव साक्षीदार असलेली,
आहे ती माझी कुशीतली उशी.

संज्योत अंधारे, नवीन पनवेल
‐—————————————

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.