Press "Enter" to skip to content

सिटी बेल मधील बातमीच्या दणक्याने आले मनसेच्या मागणीला मोठं यश


सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । याकूब सय्यद । 🔷🔶🔷

काही दिवसापूर्वी सिटी बेल मध्ये नागोठणे येथील होली अंजल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेकडून भरमसाठ शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना फी आकारली जात असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

विद्यार्थी यांचे पालकांनी वेळोवेळी शाळेकडे मागणी करून देखील शाळेने कोणतेही दखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी रोहा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष माननीय साईनाथ धुळे यांच्याकडे लेखी शाळेची फी कमी करण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे शाळेकडून १२ लाख कमी करण्यात आले.

नागोठणे एंजल इंग्लिश मिडीयम शाळेने मनसे च्या मागणी ला व पालक वर्गाच्या मागणी ला चांगला प्रतिसाद दिल्याने प्रत्येक विद्यार्थ्याचे १ हजार कमी झाले. तसेच एकूण १२०० असे विद्यार्थ्यांची फि कमी करून सहकार्य केल्या बदल हॉली एंजल शाळेलय प्राचार्य वर्गाचे व
मनसे चे साईनाथ धुळे अध्यक्ष- रोहा तालुका विद्यार्थी सेना, सौ. दिपश्री गुरव- घासे मॅडम, रोहा तालुका महिला सेना प्रल्हाद पारंगे, चिटणीस – रोहा तालुका
विनायक तेलंगे, अध्यक्ष- रोहा तालुका माथाडी सेना सचिन नेरपगार, महाराष्ट्र सैनिक किरण घासे, प्रफुल पाटील,
हर्षद मळेकर या सर्वांचे पालकांनी मानले आभार

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.