सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीतुन काळजी घेताना पुन्हा एकदा जनतेसमोर, ” माझे कुटुंब माझी जबाबदारी” या संकल्पनेनुसार उरण शिवसेना शहर शाखेतर्फे शहरातील सर्व प्रभागातील मोफत मास्क वाटप करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रविवार १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शहर शाखेत करण्यात येणार आहे.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, दिनेश पाटील, नरेश रहालकर, संतोष ठाकूर, बी. एन. डाकी, जे. पी. म्हात्रे, विजय भोईर, हिराजी घरत, महादेव घरत, रमेश म्हात्रे, कौशिक ठाकूर, चेतन म्हात्रे, नितेश पाटील, ममता पाटील, ज्योती म्हात्रे, भावना म्हात्रे, प्रणिता म्हात्रे आदींच्या शुभहस्ते वाटप करण्यात येणार आहे.








Be First to Comment