Press "Enter" to skip to content

लताताई कळंबे यांचे आमरण उपोषण स्थगित

पाली खोपोली मार्गाचे दर्जेदार व युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

वाकण – पाली – खोपोली या राज्य महामार्गाची प्रचंड  दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत मार्गाचे काम देखील बंद असून जीवघेण्या व धोकादायक मार्गावरून प्रवास करणे मोठे आव्हान ठरत असून प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल होत असल्याने रस्त्याचा सामाजिक व जनहीतार्थ प्रश्न हाती घेऊन सामाजिक कार्यकर्त्या तथा मनसे जिल्हा सचिव लताताई  कळंबे यांनी आंदोलन छेडले. एम एस आर डी सी व संबंधित  ठेकेदाराच्या विरोधात दि(26) सोमवार पासून या महामार्गावर आंबोले गावानजीक पेट्रोल पंपासमोर आमरण  उपोषण सुरू केले होते. अखेर प्रशासनाने 20 दिवसाची मुदत घेत युद्धपातळीवर महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वाशीत केले. यापुढे जनतेचा प्रवास सुखरूप होईल असा विश्वास दिला. तसे लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी कळंबे यांनी उपोषण स्थगित केले.

वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाचे रस्त्याच्या दुहेरीकरणाचे काम उप कंत्राटदार मे बेग कन्स्ट्रक्शन   कंपनी मार्फत होत होते, मात्र दुहेरीकरणाच्या कामादारम्यान वाहतूक सुरक्षितता व रस्त्याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याचे समोर आले. तसेच स्थानिक कर्मचारी व ठेकेदार यांचे देयके थकवल्यामुळे या कामाचे मुख्य EPC कंत्राटदार म्हणून मे वराह इन्फ्रा ली यांनी बेग कन्स्ट्रक्शन कंपनी ला निलंबित केल्याचे पत्रात स्पस्ट नमूद केले.  वाकण  पाली खोपोली राज्यमहामार्गाचे नव्याने काॅक्रिटीकरण व रूंदीकरणाचे  काम 2016 पासून सुरू आहे. 198 कोटी रूपयाचा निधी वापरून होत असलेल्या सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप जन माणसातून होत आहे. सद्यस्थितीत या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.

आजघडीला रस्त्याचे  काम देखील बंद करण्यात आले आहे. एम. एस.आर. डी. सी.  व संबंधीत ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरोधात सामाजिक कार्यकर्त्या तथा  मनसे च्या रायगड जिल्हा सचिव  लताताई कळंबे आक्रमक झाल्या आहेत. सदरचे रस्त्याचे काम पुन्हा चालू करावे यासाठी लताताई कळंबे यांनी उभारलेल्या आंदोलनाला जनमाणसातून उत्स्फूर्त व जोरदार पाठिंबा मिळाला. अशातच सदर रस्त्याचे काम मुख्य EPC कंत्राटदार असलेल्या मे वराह इन्फ्रा ली कंपनी  स्वतः करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कळंबे यांनी उपोषण स्थगित केले.

यावेळी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते, उपअभियंता सचिन निफाडे व निवासी अभियंता दशरथ गायके तसेच वरह इन्फ्रा. प्रा. लिमिटेड चे प्रोजेक्ट डायरेक्टर महिंद्र सिंग, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लाड, शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र चे उपाध्यक्ष केतन म्हसके,स्थानिक नागरिक  व ग्रामस्त आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.