Press "Enter" to skip to content

उर्मिला म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रा.जि.प.शाळा पाले ला थ्री इन वन कलरप्रिंटर भेट

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । पाले । 🔷🔶🔷

जे जे उत्तम ते ते सर्वांशी द्यावे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर अगणित ऋण असतत आणि त्याची परत फेड ही जर एखाधा सामाजिक उपक्रम राबवून केला तर आयुष्यात आपण एक मैलाचा दगड पार केला अस होईल.

शुक्रवार दि 30/10/2020 रोजी सारडे शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ. उर्मिला रमेश म्हात्रे मॅडम यांजकडून त्यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाले यांस थ्री इन वन कलरप्रिंटर भेट देऊन वाढदिवस साजरा केला. सामाजिक कार्यात मॅडम व त्यांचे मिस्टर रमेश म्हात्रे सर नेहमी अग्रेसर असतात, आज त्यांच्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात शाळेतील मुलांना खाऊ व शाळेस थ्री इन वन कलर प्रिंटर भेट देऊन कोरोनाच्या संकट समयी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम मॅडम यांनी केले.

सदर प्रसंगी सौ उर्मिला रमेश म्हात्रे , रमेश म्हात्रे , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आवरे ग्रामपंचायत तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत म्हात्रे , रमेश म्हात्रे सिटीझन कॉलेज उरण चे प्रोफेसर एन डी पाटील सर त्यांचे मित्र परिवार तसेच गौरव मूर्ती म्हात्रे मॅडम यांच्या नाती किलबिल कु .माही पाटील , व कु .मीरा पाटील ,सौ दर्शना गंगाराम म्हात्रे , व सौ समृद्धि जगन्नाथ म्हात्रे उपेंद्र पांडुरंग ठाकुर सर , सुनील नरे सर सौ पुष्पलता विलास म्हात्रे व इतर सहकारी शिक्षक व पाले शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.सदर प्रसंगी सोशल डिस्टसिंग चे पालन करत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.