सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
शिवरायांच्या पावन भूमीत गोरेगाव तालुका माणगाव सारख्या ठिकाणी पंचक्रोशीतील पन्नास गावातील तरुण-तरुणी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांच्या विचारांनी व कार्यानीं प्रेरित झालेल्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन रयतेचे स्वराज्य ही संघटना नुकती स्थापन करण्यात आलेली आहे.
“ना जात,ना धर्म,ना राजकीय पक्ष, रयतेचा विकास, हेच स्वप्न,” हे ब्रीद घेऊन निर्माण झालेल्या संघटनेने किल्ले रायगड स्वच्छता करण्याचे ठरवले. मात्र कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने पूर्ण किल्ल्यावर बंदी असल्याने सदरील तरुण-तरुणी चित्त दरवाजापासून पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी तसेच आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
सदर रयतेचे स्वराज्य या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांवर स्वराज्याच्या मातब्बर व्यक्तींच्या समाध्या ढासळलेल्या आहेत त्यांची डागडुजी, गडकोट किल्ले संरक्षण, तसेच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवणे असे उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून या संघटनेच्या माध्यमातून दवाखाने, शाळा, बसस्थानके, विविध धार्मिक स्थळे, व समाज उपक्रम असणारे ठिकाणी, स्वच्छता आयोजित करण्यात येणार आहे, तसेच तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.

वृद्ध, अपंग, व्यक्तींसाठी मतिमंद मनोरुग्ण यांना शासनाच्या विविध योजना सवलती मिळवून देण्याचा संघटनेकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. निसर्गामुळे येणारी आपत्ती पावसामुळे होणारे नुकसान तसेच निसर्ग मुळे येणारी आपत्ती किंवा पावसामुळे होणारे अपघात स्थळी जे बचाव कधी लागेल ती संघटनांमार्फत करण्याचे योजिले आहे. या संघटनेचे या रयतेचे स्वराज्य संघटनेमध्ये पन्नास गावातील तरुण-तरुणी एकत्र येऊन अनेक जाती-धर्माचे तरुण-तरुणी आहेत रायगड किल्ला परिसर स्वच्छता व त्यामुळे सदरील संघटनेचे गोरेगाव परिसरामध्ये कौतुक होत आहे.
या स्वच्छता मोहिमेमध्ये परिसरातील अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते यामध्ये विनोद जाधव, राजेश महाडिक, अक्षय खेडेकर, गणेश पहेलकर, सौरभ पारवे, रुपेश मोरे, मनोज महाडिक, विराज धुमाळ, कमलेश घोले , यशवंत जाधव, शुभम सावंत, सिद्धेश बलकवडे, सिद्धेश शिंदे तसेच स्वच्छता मोहिमेमध्ये मध्ये अनेक तरुणींनी सहभाग घेतला होता.
यामध्ये शिवानी पाष्टे सोनल भोजने, दिक्षिता साळवी, कल्याणी घोले, मिनाक्षी धुमाळ ,कार्तिका महाडिक, सुचीता पास्टे,तसेच प्रथमेश भोजने, राजेश वाडवळ, गणेश पवार( आर्मी) असे अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते सदरील या उपक्रमाबाबत गोरेगाव पंचक्रोशी मध्ये सदरील तरुण-तरुणी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment