सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶
तालुक्यातील पाली फाटा परिसरात गुरूवारी राञी वायूगळतीची घटना घङली असून परिसातील गावामध्ये ङोळे चुरचुरणे आणि घसा खवखवणे ञास सुरू झाल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते.गुरूवारी राञी अकराच्या सुमारास देवन्हावे,वङवळ,साजगाव परिसरात धुके सदृश्य वायू हवेत पसरला होता.गुरूवारी हवेत गारवा असल्याने वायू हवेत बराच वेळ राहिला होता. रासायनिक विषारी वायू असल्याने परिसरात नागरिकांना ञास जाणवू लागला.
याबाबत तातडीने समाजमाध्यमावर संदेश फिरला.परंतु नक्की कोणत्या कारखान्यातून वायू गळती झाली याबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याचे घबराट उडाली. दोन तासानंतर रासायनिक वायूचे हवेतील प्रमाण कमी झाल्यामुळे ञास कमी झाला.पाली फाटा परिसरातील कारखान्यातून रासायनिक गळती झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने शुक्रवारी सकाळी तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी पोलीसांना त्या भागातील कारखान्यात माहिती घेण्याचे आदेश दिले .परंतु प्रत्येक कारखाना व्यवस्थापनाने हात झटकले.प्रदूषण मंडळाने याबाबत लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
गुरूवारी राञी वायू गळतीचा प्रकार घडला. त्यानंतर तासाभरात प्रमाण कमी झाले. कोणत्या कारखान्यातून गळती झाली याची तपासणी सुरू असून प्रदूषण नियामक मंडळाला कळविण्यात आले आहे.
इरेश चप्पलवार
तहसीलदार - खालापूर
साडे अकराच्या सुमारास रस्त्यावर देखील धुक्यासारखा पांढरा वायू होता. डोळ्यांची आग आणि घसा खवखवणे ञास जाणवत होता. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या कारखान्यांवर कठोर कारवाई व्हावी. दोन वर्षापूर्वी रसायणीत माकडे आणि कबूतर विषारी वायूमुळे दगावली होती. प्रदूषण मंडळ सुस्त असल्यासारखे वागत आहे.
संदिप ओव्हाळ -ढेकू साजगाव








Be First to Comment