सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
आदिवासी कातकरी समाजासह बहुजनांच्या न्याय हक्कासाठी झटणारे व्यक्तिमत्व तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण संघटक रमेश पवार (पाली सुधागड ) यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

अनेकजण आपला वाढदिवस मनोरंजन, मौजमस्ती,पार्टी, व फिरायला जाण्याचे बेत आखून साजरा करतात, मात्र पर्यावरण प्रेमी म्हणून ओळख असलेले रमेश पवार हे दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक, विधायक उपक्रम राबवित साजरा करीत असतात. कुठेही वृक्षतोड होऊ नये, यासाठी देखील ते सातत्याने प्रयत्नशील व दक्ष असल्याचे दिसतात. पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने पवार नेहमीच अग्रेसर असतात. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना व नागरिकांना पर्यावरणाचे व वृक्षलागवडीचे महत्व पटवून देत आपल्या सभोवतालच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची वृक्षलागवड करून त्यांची जपणूक व संवर्धन करण्याचा संकल्प त्यांनी केला.

वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे,झाडांमुळे ऑक्सिजन निर्माण होते, सजीवसुष्टीसाठी वृक्ष प्राणवायू निर्माण करणारा महत्वपूर्ण घटक आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे लावावीत व ती पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांची निगा राखावी असा संदेश देखील पवार यांनी यावेळी दिला.







Be First to Comment